Published On : Wed, Sep 4th, 2019

अग्निशमन संदर्भातील प्रलंबित कामांना गती द्या : संजय बालपांडे

Advertisement

अग्निशमन व विद्युत विशेष समितीच्या बैठकीत प्रशासनाला निर्देश


नागपूर: शहरात विविध ठिकाणी अग्निशमन सुविधांच्या निर्मितीची आवश्यकता आहे. मात्र अनेक दिवसांपासून ही कामे प्रलंबित असून या कामांमध्ये येणारे अडथळे दुर करून संबंधित कामांना गती द्या, असे निर्देश अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती संजय बालपांडे यांनी दिले.

बुधवारी (ता.४) अग्निशमन व विद्युत विशेष समितीच्या संदर्भात मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती संजय बालपांडे यांच्यासह उपसभापती निशांत गांधी, सदस्या वंदना भुरे, सदस्य संदीप गवई, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
June 22 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 46,500 /-
Gold 22 KT ₹ 1,36,000 /-
Silver/Kg ₹ 2,29,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बैठकीत नागपूर शहरामध्ये नवीन ११६ हॅन्ड्रेटची निर्मिती करणे, शहर विकास आराखड्यामध्ये अग्निशमन स्थानकाकरिता आरक्षित असलेल्या झिंगाबाई टाकळी, अंबाझरी, चिंचभवन, परसोडी व सोमलवाडा या जागा ताब्यात घेणे, नव्‍याने बांधण्यात आलेल्या त्रिमूर्तीनगर अग्निशमन स्थानकाचे उद्घाटन, अग्निशमन विभागातील जुने स्थानक लकडगंज, गंजीपेठ, न्यू कॉटन मार्केट पाचपावली विभागातील जुने स्थानक पुनर्बांधकाम करणे, राठोड लेआउट येथील अग्निशमन स्थानकाकरिता असलेल्या जागा ताब्यात घेणे, वाठोडा अग्निशमन स्थानकाचे बांधकाम करणे, पथदिव्यांच्या दुरूस्तीकरीता व सुस्थितीकरीता नियुक्त एजन्सीची कामगिरी, एलएडी विद्युत दिवे लावल्यानंतर मनपाला होणारा फायदा, सर्व प्रभाग अंतर्गत बंद असलेले विद्युत दिवे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

नागपूर शहरामध्ये नवीन ११६ हॅन्ड्रेटची निर्मिती करण्याचे कार्य अनेक दिवसांपासून सुरू आहे. नागरिकांची सुरक्षा आणि सुविधेच्यादृष्टीने या कामाला लवकरात लवकर गती देण्याचे निर्देश अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापतींनी यावेळी दिले. याशिवाय शहर विकास आराखड्यामध्ये अग्निशमन स्थानाकरिता झिंगाबाई टाकळी, अंबाझरी, चिंचभवन, परसोडी व सोमलवाडा येथील जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. याबाबत संबंधितांसोबत समन्वय साधून जागा त्वरीत ताब्यात घेणे तसेच राठोड लेआउट येथील अग्निशमन केंद्राकरीता असलेल्या जागाही त्वरीत ताब्यात घेण्याबाबत त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

Advertisement

अग्निशमन विभागातील लकडगंज, गंजीपेठ, न्यू कॉटन मार्केट पाचपावली विभागातील स्थानक जवळपास शंभर वर्ष जुने आहेत. त्यामुळे स्थानकांच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत. या स्थानकांच्या पुनर्बांधकामाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत आवश्यक पाठपुरावा करुन कार्य लवकरात लवकर सुरू करावे, असेही निर्देश अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती संजय बालपांडे यांनी दिले.

🏆 BEST OF NAGPUR 2026
Which School Ranked #1?
Explore Rankings →

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

नागपुर में एमडी ड्रग्स के साथ इंजीनियरिंग छात्र गिरफ्तार #nagpurnews #crime #md #taskar #engineering

नागपुर में एमडी ड्रग्स के साथ इंजीनियरिंग छात्र गिरफ्तार #nagpurnews #crime #md...

RTMNU की डिग्री पर ही डिग्री का नाम गलत? #nagpurnews #rtmnu #nagpuruniversity #latestnews #news

RTMNU की डिग्री पर ही डिग्री का नाम गलत? #nagpurnews #rtmnu #nagpuruniversity...

बुलढाणा में मानसून की दमदार एंट्री.. #maharashtranews #latestnews #barish #mansoon

बुलढाणा में मानसून की दमदार एंट्री.. #maharashtranews #latestnews #barish #mansoon

आदिवासी जमीनों की जांच की मांग.. #nagpurnews #adivasi #latestnews #news

आदिवासी जमीनों की जांच की मांग.. #nagpurnews #adivasi #latestnews #news

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges