Published On : Mon, Aug 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

वडिलांचा 60 हजारांचा पगार, मग अमेरिकेत शिक्षण कसं? आरटीआय कार्यकर्त्यांच्या सवालावर अभिजित दिपकेंचा खुलासा

Advertisement

नागपूर -‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक आणि नीट पेपरफुटी आंदोलनामुळे चर्चेत आलेले अभिजित दिपके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी त्यांच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च आणि पक्षाच्या निधीच्या स्रोतांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

सुरत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी महाराष्ट्र सरकार, निवडणूक आयोग आणि केंद्रीय जीएसटी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. एमआयडीसीमधून कनिष्ठ अभियंता पदावरून निवृत्त झालेले दिपके यांचे वडील महिन्याला सुमारे 60 ते 65 हजार रुपये पगार घेत असताना मुलाला अमेरिकेसारख्या महागड्या देशात उच्च शिक्षणासाठी कसे पाठवले, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या आरोपांवर अभिजित दिपके यांनी ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत सविस्तर भूमिका मांडली. बोस्टन विद्यापीठातील शिक्षणाचा मोठा खर्च शिष्यवृत्तीमधून भागला, तर उर्वरित रक्कम शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून उभारली होती. हे कर्ज अद्याप फेडायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाच्या निधीबाबतही दिपके यांनी स्पष्टीकरण देताना, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे काम लोकसहभागातून मिळणाऱ्या क्राउडफंडिंगवर चालणार असून प्रत्येक रुपयाचा पारदर्शक हिशोब ठेवला जाईल, असे सांगितले.

Advertisement

दरम्यान, पक्षाची कायदेशीर नोंदणी, निधीचे स्रोत आणि आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अमित तिवारी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय जीएसटी विभागाकडे केली आहे. या प्रकरणामुळे अभिजित दिपके आणि त्यांच्या पक्षाभोवतीचा राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.