Published On : Mon, Oct 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

जेलमध्ये टाकले तरी हुकूमशाहीचा अंत केल्याशिवाय राहणार नाही;अभिजित दीपकेंची नागपुरात गर्जना

Advertisement

दिल्लीतील आंदोलनापूर्वी धरपकड; सीजेपी कार्यकर्त्यांसह कंटेंट क्रिएटर्स ताब्यात,दिपके दिल्लीत पोहोचणार

नागपूर: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे नेते काँक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांनी नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाना साधला. दिल्लीतील आंदोलनातून ते आजीच्या निधनानंतर हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिपरी या गावी जात असताना नागपूर विमानतळावर उतरले होते. त्यांनी दिल्ली पोलिस गुंड असल्याचेही नमुद केले.

नागपूर विमानतळावर अभिजित दीपके प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांना गुंड करून ठेवले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या हुकूमशाहीला घाबरणार नाही. आंदोलन सुरूच राहणार असून जेवढ्या वेळा कारागृहात टाकायचे टाकावे. त्यांच्या हुकूमशाहीचा अंत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दीपके यांनी दिला. दिल्ली पोलिस कारवाईच्या नावावर मुलींवर हात टाकत आहे. असेच सुरू राहीले तर एक दिवस ते पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांच्या इशाऱ्यावरून विद्यार्थ्यांचा खूनही करतील त्यामुळे हुकूमशाही संपवावी लागेल.

जेव्हा देश गुंड चालवतात, तेव्हा गुंडांची पदोन्नती-

ज्या पोलिसांवर आम्ही आरोप केले. त्यांना केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी पदोन्नती दिली. जेव्हा देश गुंडे चालवतात, तेव्हा गुंड्यांची पदोन्नती केले जाते, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. मला ताब्यात घेतले होते. माझ्या आजीचे निधन झाल्यामुळे चुलत भावासोबत
बोलण्याकरिता पोलिसांकडे असलेला माझा भ्रमणध्वनी मागितला. परंतु त्यांनी क्रमांक सांगा आम्ही लावतो म्हणाले. मी त्यांना माझा भ्रमणध्वनी द्या, त्यातून नंबर शोधून तुम्हाला देतो, असे म्हटले. त्यानंतरही त्यांनी मला भ्रमणध्वनी दिला नाही. कायद्यानुसार मला माझ्या वकिलाशी बोलण्याचा अधिकार आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी मला वकिलांसोबत बोलण्यासाठीही भ्रमणध्वनी दिला नाही. नातेवाईकांशीही संपर्क करू दिला नाही, असा आरोप दीपके यांनी केला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.