नागपूर : नागपूर शहरात अनेक नागरिकांना थकीत टॅक्सवर 2% प्रतिमाह प्रमाणे मोठ्या प्रमाणात शास्ती लावण्यात येत असून चक्रवाढ पद्धतीने लागत असल्यामुळे अनेकदा तर ‘टॅक्सपेक्षाही अधिक शास्ती’ अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिकांची इच्छा असूनही नागरिक टॅक्स भरण्यास असमर्थ आहे.
करिता महानगर पालिकेने 100% शास्ती माफ / जास्तीत जास्त सवलत देऊन अभय योजना सुरु करावी. अभय योजनेची मुदत किमान सहा महिन्याची ठेवण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना टॅक्स भरण्यास मुदत मिळेल.
तसेच म.न.पा. च्या महसुलात देखील भर पडेल. यापूर्वी दि.15/12/2020 रोजी राबविण्यात आली होती, अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला होता. त्याच धर्तीवर आता मार्च 2024 पर्यंत अभय योजना राबविण्याची आवश्यकता आहे. करिता महानगर पालिकेत किमान सहा महिन्यासाठी अभय योजना राबवून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशा मागणीचे पत्र आमदार कृष्णा खोपडे यांनी म.न.पा. आयुक्त यांना दिले.