Published On : Thu, Oct 17th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात आम आदमी पार्टी पक्ष निवडणूक लढवणार नाही; ‘मविआ’ला देणार पाठींबा?

Advertisement

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच एक मोठी बातमी समोर येत आहे.विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांचा पक्ष आम आदमी पार्टी उमेदवार उतरणार नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करून भाजपाविरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक न लढण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार आहे.

इंडिया आघाडी मजबूत करणे, पक्षसंघटना बळकट करणे यावर आप पक्षाकडून भर दिला जात आहे. पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे परंतु पक्षाच्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत मिळत असल्याची माहिती आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

११ ऑक्टोबर रोजी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी दिल्ली निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यालयात बूथ तयारीसाठी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे राज्य ते बुथ स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. संदीप पाठक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सध्या आप पक्षानं दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी लढवणार नाही, असे ते म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.