Published On : Tue, Apr 21st, 2020

आधार उद्धवाचा मोहीम :किशोर तिवारी यांनी केला मारेगाव व झरी तालुक्यातील दुर्गम कोलाम पोडांची अन्न वाटपाची पाहणी

दिनांक -२१ एप्रील २०२० कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आदीवासी नेते अंकित नैताम व या भागातील २००० हजारावर शेतकरी विधवा , आदीवासी ,कोलाम ,पारधी ,दलीत व अल्प संख्यक समाजाच्या अडचणीत असलेल्या कुटुंबातील १० हजारावर सद्यसाना १६ दररोज जगण्यासाठी अन्नासह आवश्यक वस्तूंचा कुलूप बंदी पासुन पुरवडा करणाऱ्या आभा प्रकल्पाच्या संयोजिका स्मिता तिवारी यांच्यासोबत भर दुपारी रणरणत्या उन्हात मारेगाव तालुक्यातील सर्वात दुर्गम रोहपट सह ५०० कोलाम कुटुंबाची सर्वात मोठी वस्ती असणाऱ्या कोलाम पोडाची तर झरी तालुक्यातील अती दुर्गम भागातील पांढरवानी ,दुबाटी तर माथार्जुन येथील लांडगी कोलाम पोडाची पाहणी केली व हजारो कोलाम कुटुंबाशी सरळ संवाद साधला मोदींनी देशात कुलूप बंदी केल्यानंतर आम्ही स्वतः कोलाम पोडवर”‘गावबंदी ” सुरु केली असुन घरातुन बाहेर पडणे बंद केल्याचे सांगीतले मात्र या एक महीन्यात एकही अधिकारी वा नेता गावात भेटायल्या आला नसल्याचे त्यांनी सर्वच पोडावर किशोर तिवारी यांना सांगीतले तेंव्हा तिवारी यांनी मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठविल्याचे सांगुन आपल्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील असे आश्वासन यावेळी दिले .

रोहपट येथे दुपारी १ वाजता वाजता किशोर तिवारी रोहपट गावात पाहणी केल्यावर येण्याच्या एका दिवसापुर्वी लगबगीने ५ किलो प्रति मानसी तांदुळ वाटल्याचे लोकांनी सांगीतले मात्र केशरी शिधा पत्रिका व शेतकऱ्यांना काय वाटप झाले नाही असा सवाल शेतकऱ्यांनी केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त बी पी एल व प्राधान्य शिधा वाटप धारकांना दिले असुन शेतकऱ्यांना दिले नसल्याचे सांगितल्यावर लोकांची समाधान झाले त्यांनतर रोहपट जवळील कोलाम पोडावर चावडी समोर किशोर तिवारी देह दुरी (सोशल डिस्टंटिंग ) व मास्क लाऊन आढाव घेतला त्यावेळी अनेक कोलामाना शिधा पत्रिका नसल्यामुळें त्यांना अन्न मिळत नसुन आमची उपासमार होत असल्याची तक्रार केली तेव्हा किशोर तिवारी यांनी पुरवडा मंत्री भुजबळ यांच्याकडे तक्रार करून तात्काळ शिधा पत्रिका देण्याची विनंतीम केली .


पेंढरी कोलाम पोडावर शेकडो महिलांनी फक्त गहु तांदुळ दिल्याने काय होणार भाजी चटणी तेल यासाठी खावटी देण्याची मागणी केली त्यावेळी किशोर तिवारी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खावटी देण्यासाठी आग्रह धरणार असल्याची माहीती दिली .यानंतर झरी तालुक्यातील अती दुर्गम भागातील पांढरवानी ,दुबाटी तर माथार्जुन येथील लांडगी कोलाम पोडावर भेटी दिल्या तेव्हा सर्वच पोडावर त्याच दिवशी अन्न वाटल्याची माहीती देण्यात आली .


यावेळी आदीवासी नेते अंकीत नैताम यांनी जर कट रचुन अधिकारी कोरोना कुलूप बंदीच्या नावावर आदिवासींची उपासमार करीत असतील आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू अशी धमकी दौऱ्यांनंतर दिली .किशोर तिवारी कोरोना कुलूप बंदीमध्ये आदिवासी समस्यांना अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सादर करणार असल्याची माहीती यावेळी दिली .