नागपूर: शहरातील पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चंद्रनगरमध्ये एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.मृताचे नाव हर्ष राजू शेंडे आहे. या हत्येत दोन प्रौढ आणि एक अल्पवयीन आरोपी सहभागी असल्याची माहिती आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हर्ष राजू शेंडे याने २०१८ मध्ये अमोल हमने नावाच्या व्यक्तीची हत्या केली.याचा बदला म्हणून आता आरोपींनी हर्षचा खून केला.
पारडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. सध्या प्रकरणातील सर्व आरोपी फरार असून पारडी पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.