नागपूर: शहरात महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आशिष खुमराज बोपचे नावाच्या २४ वर्षीय तरुणाला अटक केली.
ही घटना ११ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता घडली जेव्हा अल्पवयीन मुलगी तिच्या परिसरातून जात होती.
तक्रारीनुसार, आरोपीने मोटारसायकलवरून मुलीजवळ येऊन तिच्याशी अयोग्य वर्तन केले. अश्लील शेरेबाजी केली तसेच लैंगिक संबंधांची मागणी केली. तसेच तिने घटनेबद्दल कोणाला सांगितले तर तिला आणि तिच्या कुटुंबाला मारण्याची धमकीही दिली.
तक्रारीच्या आधारे, उपनिरीक्षक कात्रे यांनी बीएनएस कलम आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.