
नागपूर: नराधम युवकाने बारावीच्या विद्यार्थिनीशी फेसबुकवर ओळख पटवून तिला आपल्या जाळयात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती दोन महिन्यांची गर्भवती झाली. पोटात दुखत असल्यामुळे ती आईसह मेयो रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी गर्भवती असल्याचे निदान केल्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. अखिल राजू नागवंशी (२०, समतानगर, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी स्नेहा (बदललेले नाव) ही बारावीत शिकते. तिची फेसबुकवरून अखिल नागवंशी याच्याशी ओळख झाली. अखिल हा कोराडीतील एका बेकरीत काम करतो. दोघांची मैत्री झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला ऑगस्ट २०२२ मध्ये फिरायला जायचे सांगून घरी नेले. स्वतःच्या घरी त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.त्यानंतर हा प्रकार सुरूच राहिला.
मागील आठवड्यात पीडित मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार तिच्या आईकडे केली. ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यामुळे तिच्या आईने विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितले. पिडतेच्या आईच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून अखिलला अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
युवती के घर में घुसकर अश्लील हरकत #vidarbhanews #nagpur #newsupdate #crimenews #vidarbha
MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult
पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews
नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime #CrimeNews...
सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition...




