Published On : Fri, Jul 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ड्रग्जवरून झालेल्या वादात तरुणीचा तरुणावर चाकूने हल्ला

Advertisement

नागपूर : एमडीची नशा केलेल्या तरुणीने नागपूरच्या घाट रोडवरील ओयो हॉटेलच्या खोलीत एका तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. मात्र, हा तरुण कसा तरी खोलीतून पळून गेला.या घटनेची माहिती हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांना दिली.

ओयोचे हॉटेल सिल्व्हर नेस्ट हे गणेशपेठ पोलिस ठाण्याजवळ घाट रोडवर आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी हॉटेलच्या खोलीत घडली. अनिकेत अशोक देडगे असे जखमी तरुणाचे नाव असून तो प्रताप नगर येथील सावजी हॉटेलमध्ये काम करतो. तसेच तो रामबाग येथील रहिवासी आहे.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तर मुलगी १९ वर्षांची असून ती मूळची चंद्रपूरची आहे. ती मनीष नगर, नागपूर येथे भाड्याने राहत असून नीटची तयारी करीत आहे. अनिकेतची या तरुणीशी 2 दिवसांपूर्वी एका मित्रामार्फत ओळख झाली होती. अनिकेतने गुरुवारी फोन करून तरुणीला भेटायला बोलावले. दिवसभर कारने शहरात फिरून दोघेही पहाटे एकच्या सुमारास ओयोच्या हॉटेल सिल्व्हर नेस्टमध्ये पोहोचले.यादरम्यान त्यांनी शाररिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती आहे.

पहाटे पाचच्या सुमारास मुलीने सिगारेट ओढण्याचा हट्ट धरला. त्यानंतर दोघेही कारने मेडिकल स्क्वेअरवर पोहोचले, तेथे सिगारेट आणि हेल्थ ड्रिंक्स घेतल्यानंतर ते हॉटेलच्या खोलीत परत आले. यानंतर एमडी सेवन केल्यानंतर दोघांनी पुन्हा शारिरीक संबंध ठेवले . यादम्यान पैशावरून दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून तरुणीने जवळच असलेल्या तरुणावर चाकूने हल्ला केला मात्र, झालेल्या हाणामारीत तरुणीच्या हातावरही चाकूचे वार झाले. या घटनेनंतर हा तरुण कपड्यांशिवाय खोलीतून पळून गेला.

Advertisement

गणेश पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर मुलीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. तसेच पोलसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरु केला.

Advertisement
Nagpur Protest: Protesters Sing National Anthem During Police Detention | Samvidhan Chowk | Video

Nagpur Protest: Protesters Sing National Anthem During Police Detention | Samvidhan Chowk...

nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges