नागपूर : रविवारी पहाटेच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येची घटना घडली आहे. सिगारेट ओढणाऱ्या दोन तरुणींना रागावल्याने युवकाचा खून केल्याचे समोर आले.
मुली असून तुम्ही सिगारेट ओढता, तुम्हाला लाज वाटायला हवी,’ असा सल्ला युवकाने दोन तरुणींना दिला. याचा राग आल्याने तरुणींनी आपल्या मित्राला बोलावून त्या युवकाचा खून केला. रंजीत बाबुलाल राठोड (२६, ज्ञानेश्वरनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणींसह तिघांना अटक केली आहे.
माहितीनुसार, रंजीत राठोड हा गल्लोगल्ली जाऊन साडी विक्रीचा व्यवसाय करतो. तो पत्नी व तीन मुलांसह ज्ञानेश्वरनगरात राहतो. तो शनिवारी रात्री अकरा वाजता जेवन करून फिरायला बाहेर पडला होता. त्यावेळी जयश्री पानझाडे (२४, वाडी) आणि सविता सायरे (२३) या दोन तरुणी महालक्ष्मी नंबर एक, बाकडे सभागृहाजवळ सिगारेट ओढत होत्या. त्याने दोन्ही तरुणींना सिगारेट का ओढतात, असा सवाल केला.दोघींनाही त्याचा राग आला.
जयश्रीने तिचा मित्र आकाश गणेश राऊत (हसनबाग) याला फोन केला आणि तेथे बोलावून घेतले. त्यानंतर तिघांनीही त्याला जबर मारहाण केली. जयश्री आणि सविता यांनी रंजितचे हात पकडले तर आकाशने चाकूने सपासपा वार करून खून केला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी रंजितचा जावई शंकर रॉय यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तिन्ही आरोपींना अटक केली.
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...
फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews
नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...
उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...
व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam
ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...





