नागपूर: शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे.यातचअंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या भीषण अपघातात एक तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.मच्छिंद्र गणेश वाघमारे (24, रा. संजय नगर, सिंगल लाईन चर्चजवळ) असे मृताचे नाव आहे दोन मोटारसायकलची सामोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला.मात्र, या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
मच्छिंद्र मंगळवारी सकाळी त्यांच्या पल्सर मोटारसायकल क्रमांक एमएच ३१ एफ. जे 886 वर शंकर नगर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर ते घराकडे जात होता. यावेळी शिवाजी नगर, खनीज भवन येथील कार्यालयासमोरील रस्त्यावर विरुद्ध बाजूने आलेल्या दुचाकीस्वाराने मच्छिंद्र यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मच्छिंद्र गंभीर जखमी होऊन खाली पडला तर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर मच्छिंद्रला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी गणेश लखनलाल वाघमारे (वय 65) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.