Published On : Fri, Jun 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरजवळच्या भिवापूर येते अल्पवयीन मुलीला बलात्कार ; नराधमाला अटक

Advertisement

नागपूर : जिल्ह्यातील भिवापूरमध्ये बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलून नेऊन घरात कोंडून बलात्कार करण्यात आला. मुलीने नराधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. तसेच घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवकाला अटक केली. सागर जनार्धन राऊत (२२) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी बारावीत शिकते. तिचे आईवडिल शेतमजुरी करतात. तिच्यावर आरोपी सागर राऊत याची वाईट नजर होती. तो नेहमी तिच्या पाठलाग करीत तिला जातीवाचक शिवीगाळ करीत होता. त्याची एकदा तक्रार आईवडिलाकडे केली होती. त्याची समजूत घालण्यात आली होती.

मात्र नंतरही त्याने मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले. अनेकदा त्याने तिची रस्त्यावरच छेड काढली. सागरने तिला बलात्कार करण्याची धमकी दिली होती. २६ जूनला दुपारी बारा वाजता वस्तीतील लोक शेतात गेल्यानंतर मुलगी आजीला बोलवायला शेजारी जात होती. याचदरम्यान रस्त्यावरून उचलून घरी नेले. तिच्यावर बलात्कार केला. तिने खिडकीतून उडी घेऊन तेथून पळ काढला. सायंकाळी आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागर राऊत याला अटक केली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.