Advertisement
नागपूर : शहरातील सदर पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या प्रोवनिशीयल लाईफस्टाईल रिटेल सर्विस तनिष्क फ्रेंचायसी शोरूम 22 कॅरेट सोन्याच्या दोन बांगड्या चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक करत चोरी केलेल्या बांगड्या जप्त केल्या आहेत.
माहितेनुसार, २६ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० च्या सुमारास सदर परिसरातील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या प्रोवनिशीयल लाईफस्टाईल रिटेल सर्विस तनिष्क फ्रेंचायसी शोरूम मध्ये सोन्याच्या बांगड्या चोरी गेल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी तनिष्क फ्रेंच्यासी शोरूमच्या सीईओ रीना फ्रँसीस पिंटो यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून महिलेचा शोध घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरी केलेल्या बांगड्या जप्त करण्यात आल्या आहेत.