Published On : Wed, Feb 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कळमना परिसरात उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, शेजाऱ्याला अटक

Advertisement

नागपूर : कळमना परिसरातील मिनीमाता नगर येथे उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी शेजाऱ्याविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

मृत बालकाचे नाव कुश राजेंद्र पटेल (वय २) असे आहे. तो काही वेळ घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. दरम्यान, घरासमोरील शेजारी गुड्डू उर्फ इमामुद्दीन मोहम्मद अझरुद्दीन शहा (वय ४२) यांच्या घराबाहेर जिन्याखाली असलेल्या उघड्या पाण्याच्या टाकीत कुश बेशुद्ध अवस्थेत आढळला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कुटुंबीयांनी तातडीने चिमुकल्याला बाहेर काढून प्रथम पारेख क्लिनिक आणि त्यानंतर वर्धमान नगर येथील डॉ. पुगलिया रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी जितेंद्र शंकर पटेल (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत संबंधित शेजाऱ्याने पाण्याची टाकी कोणतेही झाकण किंवा संरक्षक आच्छादन न ठेवता उघडी ठेवली होती, त्यामुळेच चिमुकल्याचा तोल जाऊन तो टाकीत पडल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

Advertisement

पोलीस उपनिरीक्षक हनुमंत इंगळे यांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, उघड्या पाण्याच्या टाक्या व धोकादायक रचना सुरक्षित ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Advertisement
16 साल की नाबालिग को शादी का झांसा देकर यौन शोषण का आरोप.. #NagpurNews #POCSOCase #Crime #News

16 साल की नाबालिग को शादी का झांसा देकर यौन शोषण का...

Jalgaon में नकली देशी शराब की फैक्ट्री का भंडाफोड़!#FakeLiquor #MaharashtraNews #Excise #CrimeNews

Jalgaon में नकली देशी शराब की फैक्ट्री का भंडाफोड़!#FakeLiquor #MaharashtraNews #Excise #CrimeNews

Nagpur Crime: 14 साल की बेटी के कथित यौन शोषण का आरोप #NagpurNews #POCSOCase #NagpurCrime #News

Nagpur Crime: 14 साल की बेटी के कथित यौन शोषण का आरोप...

एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप

एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप

भिवंडी में खेत की जमीन पर कब्जे का आरोप

भिवंडी में खेत की जमीन पर कब्जे का आरोप

मुंबई आंदोलन पर जरांगे पाटील का बड़ा ऐलान.. #Jarange #MarathaReservation #MumbaiProtest #News

मुंबई आंदोलन पर जरांगे पाटील का बड़ा ऐलान.. #Jarange #MarathaReservation #MumbaiProtest #News

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges