Published On : Sat, Jun 13th, 2020

विलगीकरण कक्षात सेवा देणा-या कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार

नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले यांनी मानले सर्व सफाई कर्मचा-यांचे आभार


नागपूर : वाठोडा येथील सिम्बॉयसिस कॉलेजच्या विलगीकरण कक्षामध्ये मागील दोन महिन्यांपासून अविरत सेवाकार्य बजावणा-या सर्व कोव्हिड योद्ध्यांचे नेहरूनगर झोन सभापती तथा प्रभाग २६च्या नगरसेविका समिता चकोले यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देउन सत्कार केला.

यावेळी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना नागपूर अध्यक्ष राकेश गांधी, भाजपा पूर्व नागपूरचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोले यांच्यासह भाजपा प्रभाग २६चे वार्ड अध्यक्ष सुरेश बराई, रामशरण बनिया, छाया गुजेंवार आदी उपस्थित होते. सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करून मास्क लावून सर्व मान्यवरांनी कोव्हिड योद्ध्यांना गौरन्वित केले.

मागील दोन महिन्यापासून स्वत:च्या घर आणि कुटूंबापासून दूर राहून नागरिकांच्या सेवेसाठी विलगीकरण कक्षामध्ये कर्तव्य बजावणा-या मनपाचे अधिकारी व सफाई कर्मचा-यांचे यावेळी नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले यांनी आभार मानले.

कोव्हिडसोबतच्या युद्धात कोरोना योद्ध्यांना सन्मान द्यायला हवा, असे आवाहन वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात. स्वत:चा जीव धोक्यात घालून समाजाची सेवा करणा-या या योद्ध्यांप्रती आपण आभार व्यक्त करायला हवे, असेही त्या यावेळी म्हणाल्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना नागपूर अध्यक्ष राकेश गांधी यांनी पण मनपाचे अधिकारी व सफाई कर्मचा-यांचा सत्कार करून सर्वांचे आभार मानले.