Published On : Wed, Apr 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

काळमन्यात मध्यरात्रीचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Advertisement

नागपूर : शहरातील काळमना परिसरात उशिरा रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून आणखी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी काळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार, ७ एप्रिल रोजी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना लक्ष्मीनगर चौकाजवळ घडली. लग्नसमारंभ आटोपून चार जण एकाच दुचाकीवरून (हिरो स्प्लेंडर) प्रवास करत होते. यावेळी दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर (CG 08 AS 8755) मागून जोरदार धडक बसली.

Gold Rate
Apr 08,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,46,400/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या अपघातात दुचाकी चालक सूरज भगवान रात्रे (२२) आणि त्याच्यासोबत असलेले बलवंत बंजारे (वय अंदाजे ५०) यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. अपघातातील इतर दोघे जखमी असून त्यांच्यावर नागपूरातील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

जखमींना तातडीने भावनी रुग्णालय तसेच मेयो रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्राथमिक तपासात संबंधित ट्रक सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे उभा केल्याचे समोर आले आहे.

तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन उभे करून अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला असून मोटार वाहन कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement