नागपूर : पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलिस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील MHSK पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाच्या धडकेत २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून दोन जणी गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघी युवती स्कूटीवरून वाघोली गावात मैत्रिणीच्या लग्नासाठी जात होत्या. दरम्यान, स्कूटी घसरल्याने तिघी रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. या अपघातात रश्मी विनोद बागडे हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर दोघी गंभीर जखमी झाल्या.
जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





