Published On : Wed, Apr 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अमेरिका-इराण संघर्षाला तात्पुरता विराम; दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा

Advertisement

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाला सध्या तरी विराम मिळाला आहे. दोन्ही देशांनी पुढील दोन आठवड्यांसाठी युद्धविराम (Ceasefire) जाहीर केला असून या काळात कोणतीही लष्करी कारवाई होणार नाही.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून हल्ले थांबवण्याची घोषणा केली. तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही इराणकडून युद्धविराम मान्य करण्यात आल्याची पुष्टी केली आहे.

Gold Rate
Apr 08,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,46,400/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१० एप्रिलला शांतता चर्चेची बैठक-
या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश १० एप्रिल रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे चर्चेसाठी एकत्र येणार आहेत. या चर्चेसाठी चीन आणि पाकिस्तान यांनी मध्यस्थीची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे.

हॉर्मूझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू होणार-
अमेरिकेने इराणला महत्त्वाची मागणी करत हॉर्मूझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा खुली करण्यास सांगितले होते. जगभरातील तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही मार्गिका पुन्हा सुरू करण्यास इराणने सहमती दर्शवली आहे.

पाकिस्तानची सकारात्मक प्रतिक्रिया-
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या निर्णयाचे स्वागत करत, हा शांततेकडे जाणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.
सध्या दोन आठवड्यांसाठी संघर्ष थांबला असला तरी, आगामी चर्चांवर भविष्यातील दीर्घकालीन शांतता करार अवलंबून असणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement