
नागपूर : प्रतापनगर पोलीस हद्दीतील प्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षेत नापास झाल्यामुळे विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल उचलल्याने बोलले जात आहे.
गौरी सुनील भावेकर (वय 21, मूळ रा. लुणावत नगर, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) असे मृत मुलीचे नाव आहे. गौरी ही कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. नुकतेच जाहीर झालेल्या तिसर्या सेमिस्टरच्या तीन विषयांत नापास झाल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली. प्रताप नगर पोलीस हद्दीतील प्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहातील खोली क्रमांक 213/A येथे रविवारी सायंकाळी 7.30 ते 8.30 च्या दरम्यान नैराश्यग्रस्त गौरीने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून घेतला.
वसतिगृह वॉर्डन अर्चना संदेश बुरबुरे (50) यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे प्रताप नगर पीएसआय कुलसुंगे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू केला आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...
नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से...
हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV
नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda...
मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews




