Published On : Wed, Feb 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील नारा रोडवर भरधाव वाहनाची धडक; तरुणाचा मृत्यू, एक जखमी

Advertisement

नागपूर: जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा रोडवर भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मृत तरुणाचे नाव शुभम परमानंद जनबंधू (३२) असे असून तो नारा रोडचा रहिवासी होता.

Gold Rate
04 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,60,300 /-
Gold 22 KT ₹ 1,49,100 /-
Silver/Kg ₹ 2,87 100 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास शुभम आपल्या नातेवाईक गौरव अनिल उईके (२६) याच्यासोबत दुचाकीने जात असताना नारा मैदानाजवळ हा अपघात घडला. टाटा एेस (MH-49-BZ-0396) हे वाहन भरधाव वेगात येत दुचाकीला धडकले. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ दोघांनाही उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती शुभमला मृत घोषित केले, तर गौरववर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी गौरवच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी संबंधित वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील वेगमर्यादा पाळण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement