नागपूर: पावसाळा सुरु झाला की सापांचे दर्शन होण्यास सुरुवात होते.यातही मानवीवस्त्यांमध्ये साप सापडण्याचे प्रमाण वाढत आहेत. यातच नागपुरातील सुभाष नगर मेट्रो स्टेशनमध्ये चक्क साप आढळल्याने खळबळ उडाली.
स्टेशनच्या लिफ्टमध्ये प्रवाशाला साप दिसला. यानंतर त्याने सुरक्षा रक्षका याबाबत माहिती दिली.
यानंतर स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी विदर्भ सर्पमित्र समितीचे सदस्य अमित वंजारी व आकाश मंडल व आकाश मेश्राम याना कॉल करुण बोलवले.तिन्ही सर्पमित्रांनी रात्रभर सापाचा शोध घेतला.
मात्र रात्री त्यांना साप सापडला नाही. मात्र तोच साप दुसऱ्या दिवशी परत एका सुरक्षा रक्षकला दिसला, त्यांनी परत सर्पमित्रांना बोलवले. बऱ्याच प्रयत्नानंतर सर्पमित्रांना लिफ्टमधून सापाला पडकण्यात यश आले.
तो साप बिनविषारी असून धोंड्या या प्रजातीचा असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली. तो साप सांडपाण्याच्या जागेतून त्या ठिकाणी आला असावा असे सर्पमित्र सांगत होते. सापाला पकडल्यानंतर सर्पमित्रांनी त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडले.