Published On : Mon, Sep 28th, 2020

भंडारा जिल्ह्यात आज विक्रमी 453 रूग्णांना डिस्चार्ज

Advertisement

·रिकव्हरी दरात वाढ, 67 टक्के
·157 कोरोना पॉझिटिव्ह
·बरे झालेले रुग्ण 3412
·पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 5107
·क्रियाशील रुग्ण 1590
·आज 02 मृत्यू
·एकूण मृत्यू 105

भंडारा : जिल्ह्यात आज विक्रमी 453 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून जिल्ह्याच्या रिकव्हरी रेट मध्ये वाढ होऊन तो 67 टक्क्यांवर गेला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3412 झाली असून आज 157 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5107 झाली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 113, साकोली 01, लाखांदूर 01, तुमसर 11, मोहाडी 13, पवनी 07 व लाखनी तालुक्यातील 11 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 3412 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 5107 झाली असून 1590 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 105 झाली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या- भंडारा- 2705, साकोली – 345, लाखांदुर- 211, तुमसर- 478, मोहाडी- 485, पवनी- 413 व लाखनी- 470 असे एकूण 5107 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले. यापैकी 3412 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.5 टक्के एवढा आहे.

Advertisement

आज 28 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 182 व्यक्ती भरती असून 2033 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.