Published On : Tue, Oct 29th, 2019

गोवर्धन पूजेनिमित्त रेड्याची मिरवणूक उत्साहात

Advertisement

कामठी:-भारत हा कृषिप्रधान आणि संस्कृती प्रधान देश आहे या देशात प्रत्येक सन मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो , होळी , पोळा , दिवाळी सारख्या सणांना या देशात एक महत्वाचे स्थान आहे यानुसार या सनाचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा .

यानुसार दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्यानिमित्त गोवर्धन पूजा केली जाते या दिवशी रेड्याची मिरवणूक काढन्यात येते याला एक दंतकथेचा आधार आहे या पूजेसाठी ब्रजवासीयांनी जेव्हा 56 भोग तयार केले होते तेव्हा परमेश्वराने गोवर्धन पर्वतात प्रवेश करून त्या 56 पदार्थाचा भोग केला आणि ब्रजवासीयांना सुख शांती आणि समृद्धीचा शुभाशीर्वाद दिला

या दिवशी भक्तगण गोपालन तसेच निसर्गाच्या सुरक्षेची शपथ घेतात , गोपालन तसेच गोरक्षेचे प्रण करून निसर्गाची रक्षा करण्याचा निर्धार करतात या कथेद्वारे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळीच्या दुसऱ्या दीवशी गोवर्धन पूजेच्य माध्यमातुन येथील यादवी समाजबांधवांनी आपापल्या घरच्या रेड्याला सजवून शोभायात्रा काढून शहरातील मुख्य रस्त्याने भ्रमण करीत ढोल तश्याच्या गजरात नाचत गाजत मिरवणूक काढली तर घरासमोर गोधनाची स्थापना करून गृहिणींनी त्याची पूजा केली .

मिरवणुकीत अनंतलाल यादव, प्रभूदयाल यादव, उदयसिंग यादव, इंदलसिंग यादव,बनवारी यादव, शीतल पटेल, धीरज यादव, रामनाथ यादव, रामभरोसे यादव, सदन यादव, भैय्याजी यादव, शिव यादव, नितेश यादव, बिल्लू यादव, कल्लू यादव, राजा यादव, , ,, जयपाल यादव, ज्ञानसिंग यादव विनोद पटेल, मुकेश यादव,कृष्णा पटेल, सुशील यादव, गोल्डी यादव, पप्पू यादव, बाबा यादव , पंकज यादव, , विक्की यादव, मनोज यादव, आदींचा सहभाग होता.

संदीप कांबळे कामठी