Published On : Fri, Jun 27th, 2025
By Nagpur Today Nagpur News

शालिनीताई गर्ल्स होस्टेलमध्ये रात्रीची खळबळ: वॉशरूममध्ये लपून बसलेला विषारी नाग साप सुखरूपरीत्या पकडला!

Advertisement

नागपूर : शहरातील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयाच्या शालिनीताई गर्ल्स होस्टेलमध्ये गुरुवारी रात्री एक धक्कादायक आणि धास्तावणारी घटना घडली. रात्री सुमारे ११ वाजता, होस्टेलच्या चौथ्या मजल्यावरील वॉशरूममध्ये एक विषारी साप असल्याचे निदर्शनास आले.

होस्टेलमधील एका विद्यार्थिनीने वॉशरूममध्ये प्रवेश करताना अचानक साप पाहिल्याने ती घाबरली. तिने तत्काळ सिक्युरिटी गार्ड यांना याची माहिती दिली. गार्डने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्वरित VSS ग्रुपचे सर्पमित्र आकाश मेश्राम यांच्याशी संपर्क साधला.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आकाश मेश्राम यांनी काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली व वॉशरूममध्ये लपून बसलेल्या सापाला अत्यंत दक्षतेने सुरक्षितरीत्या पकडले. विशेष म्हणजे, सदर साप नाग जातीचा असून अत्यंत विषारी होता, अशी माहिती नंतर मिळाली.

विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण

Advertisement

घटनेनंतर काही काळ होस्टेलमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र विद्यार्थिनीने दाखवलेली सतर्कता, सुरक्षा रक्षकांची त्वरित कृती आणि सर्पमित्रांची वेळेवर उपस्थिती यामुळे संभाव्य धोका टळला.

सतर्कतेचे कौतुक, पण सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह

विद्यार्थिनी, सिक्युरिटी गार्ड आणि सर्पमित्र आकाश मेश्राम यांचे प्रशंसनीय कार्य सध्या कौतुकाचा विषय बनले आहे. मात्र या घटनेमुळे होस्टेलमधील सुरक्षेच्या यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासनाने वारंवार निरीक्षण, फुमिगेशन आणि सुरक्षा उपाय अधिक बळकट करावेत, अशी जोरदार मागणी पालक व विद्यार्थिनींकडून होत आहे.

प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन नागपूर टुडेमार्फत करण्यात येत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.