Published On : Tue, Oct 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमधील कळमना परिसरात अल्पवयीन मुलाने केला तीन दुचाकीस्वारांवर चाकूने हल्ला;एकाचा मृत्यू

Advertisement

नागपूर : शहरातील कळमना परिसरता हत्याची घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने किरकोळ वादातून तीन दुचाकीस्वारांव चाकूने हल्ला केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागेश गणेश साहू (वय 22) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर शिवा सेलोकर (23) आणि गोविंद साहू (22) असे जखमी तरुणांची नावे आहेत. डीप्ती सिग्नल परिसरात काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.या घटनेत सहभागी असलेल्या अल्पवयीन आणि तरुणांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड होते का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश, सेलोकर आणि साहू दुचाकीवर ट्रिपल सीट चालले होते. किरण हिरा (वय 19) हा आपल्या अल्पवयीन साथीदारासह दुसऱ्या दुचाकीवर होता. हिराने अचानक ब्रेक लावला. नागेशनेही ब्रेक लावला कारण त्याची दुचाकी हिरा यांच्या वाहनाला जवळपास धडकली होती. यामुळे जोरदार वाद घडला.

नागेश, शिवा सेलोकर आणि गोविंद साहू यांनी 16 वर्षीय तरुणाला खाली पाडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत नागेश ठार झाला तर शिवा आणि गोविंद हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पीआय प्रशांत पांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.