Published On : Thu, Sep 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीमधील प्लास्टिक कारखान्याला भीषण आग

Advertisement


नागपूर : हिंगणा एमआयडीसी परिसरातील निलडोह येथील विन प्लास्टिक कारखान्याला बुधवारी रात्री भीषण आग लागली. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली. ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण लगेच समजू शकले नाही. मात्र, या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर हिंगणा पोलीस आणि अग्निशमन व आपत्कालीन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Advertisement
Advertisement
Advertisement