Advertisement
नागपूर : शहरातील जुना कामठी रोडवर असलेल्या फर्निचरच्या कारखान्यालाआज बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच कळमना अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. आगीत लाखोंचा माल जळून खाक झाल्याची माहिती आहे.
अग्नीशमन पथकाने केलेल्या पंचनाम्यानुसार आग शॉट सर्किटमुळे लागल्याची नोंद केली आहे.आग विझविण्यासाठी लकडगंज, सुगतनगर केंद्रावरून गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या.हे गोदाम शेंडे नावाच्या व्यक्तीचे असल्याचे सांगितले जात आहे.