Published On : Wed, Jun 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

राज्य सरकारचा मोठा निर्णय; आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Advertisement

मुंबई : राज्य सरकारने आज आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. कौशल्य विकास, विपणन महामंडळ, ओबीसी बहुजन कल्याण विभागासह इतर विभागांमध्ये नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत हालचाल निर्माण झाली आहे.

सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत आदेशानुसार खालीलप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत:

बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची यादी:
नितीन पाटील (IAS: SCS: 2007)
सध्याचे पद: आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्यमिता, नवी मुंबई
नवीन नियुक्ती: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कपाशी उत्पादक विपणन महासंघ, मुंबई

ए. बी. धुलज (IAS: SCS: 2009)
सध्याचे पद: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कपाशी उत्पादक विपणन महासंघ
नवीन नियुक्ती: सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई

Advertisement

लहू माळी (IAS: SCS: 2009)
सध्याचे पद: व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई
नवीन नियुक्ती: आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्यमिता, नवी मुंबई

बाबासाहेब बेलदार (IAS: SCS: 2015)
सध्याचे पद: अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग
नवीन नियुक्ती: व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई

एम. मुरुगनाथम (IAS: RR: 2020)
सध्याचे पद: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया
नवीन नियुक्ती: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड

आदित्य जीवन (IAS: RR: 2021)
सध्याचे पद: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड
नवीन नियुक्ती: संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कॉम, छत्रपती संभाजीनगर

मीनू पी.एम. (IAS: RR: 2021)
सध्याचे पद: सहाय्यक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती
नवीन नियुक्ती: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया

मानसी (IAS: RR: 2021)
सध्याचे पद: सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली
नवीन नियुक्ती: आयुक्त, महानगरपालिका

राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण

या बदल्यांमुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये नवीन प्रशासकीय दिशा निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक नवोदित आणि अनुभवी अधिकाऱ्यांना नवे जबाबदारीचे पद मिळाले असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.