Published On : Wed, Jun 3rd, 2020

ड्रोनद्वारे रेल्वेतील गुन्हेगारीवर नजर

– चौकीसाठी १२ मोटारसायकल्स
– प्रत्येक गाडीत ५ आरपीएफ जवान

नागपूर: लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदी पसरली आहे. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच कोसळली असून, ती पूर्वपदावर येण्यास बराच अवधी लागेल. दरम्यान, जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी प्रत्येकालाच हातपाय हलवावे लागतील. अशात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पाश्र्वभूमीवर आरपीएफ आतापासूनच सज्ज आहे. सोमवारपासून सुरू होणाèया रेल्वे गाडीत प्रत्येकी पाच जवान सुरक्षा देतील. यासोबतच येत्या काही दिवसात ड्रोनच्या मदतीनेही गुन्हेगारीवर नजर ठेवली जाईल.

नागपूर रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याच्या सोबतीला आता ड्रोन येणार आहे. खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, महिनाभरात मुंबई qकवा इतर महानगरातून ड्रोन खरेदी केला जाईल. नागपूर विभागातील नागपूर, अजनी, वर्धा, बल्लारशा आणि इतर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर या ड्रोनचा वापर होणार आहे. गर्दीच्या वेळी विशेषतः धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिन आणि बाबासाहेबांचा जन्म दिन यासोबतच दसरा, दिवाळी, निरनिराळे धार्मिक उत्सव, जत्रा, सत्संग आदी कार्यासाठी आलेल्यांवर अर्थात गर्दीच्या ठिकाणी ड्रोन नजर ठेवणार आहे.

यासोबतच नागपूर विभागात नागपूर, अजनीसह ९ ठाणे आणि ८ चौक्या आहेत. प्रत्येक चौकीत एक मोटारसायकल असणे गरजेचे आहे. त्याचाही प्रस्ताव मंजूर झाला आहे. १५ दिवसात प्रत्येक चौकीला एक मोटारसायकल मिळणार आहे. मोटारसायकलच्या माध्यमातून गुन्हेगारांची चौकशी, तपास आणि कानोसा घेतला जाईल, कारण प्रत्येक ठिकाणी चारचाकी वाहन घेऊन जाणे शक्य नसल्याने मोटारसायकलच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

सोमवार १ जूनपासून देशात २०० रेल्वे गाड्या (अप-डाऊन) सुरू होत आहेत. यापैकी २२ गाड्या नागपूरमार्गे जाणार आहेत. प्रवाशांची सुरक्षा म्हणून प्रत्येक गाडीत आरपीएसएफचे जवान तैनात असतील. १०० जवानांची एक तुकडी मुंबई येथून बोलाविण्यात आली आहे. या सर्व जवानांना स्कॉqटगसाठी लावण्यात आले आहे.

भौतिक दूरत्व आणि गुन्हेगारीवर नियंत्रण
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे आणि भौतिक दूरत्व राखणे हे जवानांसाठी मोठे आव्हान आहे. प्रवाशांना सुरक्षा द्यायची आहे, तर त्यांच्यात वावरावेच लागेल. लोकांच्या सतत संपर्कात असल्याने जवानांनासमोर मोठे आव्हान आहे. धोका असतानाही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ते कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. कर्तव्यावर असताना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. आता सोमवारपासून चालणाèया रेल्वेने आरपीएफ जवानांची जबाबदारी पुन्हा वाढणार आहे.

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार
नागपूर रेल्वे स्थानक तसेही अवैध वेंडर मुक्त आहे. यापुढेही कोणी विनापरवानगी खाद्यपदार्थ विकताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आरपीएफची पथके सज्ज आहेत. अत्याधुनिक सीसीटीव्ही सोबतच ड्रोन आणि मोटारसायकलही येत आहे. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाèयांचे धाबे दणाणले आहे. आतापर्यंत प्रतिष्ठान आणि कार्यालयावर धाडसत्र सुरू होते; यानंतर थेट घरात धाडसत्र चालविले जाईल. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जवानांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असे मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांनी सांगितले.