Advertisement
नागपूर :जिल्ह्यातील उमरेड नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
उमरेड-नागपूर महामार्गावर सायंकाळच्या सुमारास वन्य प्राणी रस्ता ओलांडताना दिसतात. अनेकदा प्राण्यांना यादरम्यान अपघातात जीवही गमवावा लागतो.
यातच उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग 353 डी वरील व्हीआयटी कॉलेज परिसरात रस्ता ओलांडत असताना दुपारी 1.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि शवविच्छेदन करून बिबट्याचा मृतदेह उमरेड येथे नेण्यात आला.
Advertisement