नागपुर – आज आम आदमी पार्टी मध्य नागपुर मध्ये श्री जगजीत सिंग – महाराष्ट्र कोषाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात आणि मध्य नागपुर प्रभारी निलेश गोयल, विदर्भ जनसंपर्क संघटन मंत्री आकाश सपेलकर, शहर सचिव भूषण ढाकुलकर, युवा आघाडी अध्यक्ष गिरीश तितरमारे, मध्य नागपुर संयोजक लक्ष्मीकांत दांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितित मध्य नागपुरातील शिवसेना पदाधिकारी यांनी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश घेतला.
पक्ष प्रवेश अरुण निनावे यांच्या नेतृतत्वात घेण्यात आला या वेळी आयुष ताकघरे, मुकेश निमजे, घन्श्यामजी अम्भोलीकर, आशिष निमजे, महेंद्र निमजे, तेजस निनावे, सौरभ वानखेडे, राजू निमजे, राज निनावे, अभी बघेल, रोशन पराते व अन्य 25 हुन अधिक शिवसेना कार्यकर्ते आप मध्ये शामिल झाले. या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले व नागपूर महानरपालिका २०२२ ची निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व जागा लडविनार असल्याने पक्षात प्रवेश घेण्यासाठी कार्यकर्त्याची मोठी गर्दी झाली होती.
दिल्ली मध्ये मा अरविंद केजरवालांनी केलेले कार्य पाहून इतर पार्टीचे पदाधिाऱ्यांनीही आप मध्ये काम करण्याची तयारी दाखविणे शुरू केले आहे. येणाऱ्या निवणुकीत जनते मध्ये आम आदमी पार्टीला संधी देण्याची तयारी असल्याचे दिसून येत असल्यामुळे पार्टीत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत आहेत.
या प्रसंगी बबलू मोहाडीक़र, बेलेकर जी, धकाते जी, पैनिकर जी आणि अन्य पदाधिकारी प्रमुख्या ने उपस्तित होते.
