Published On : Thu, Mar 26th, 2020

कोरोना व्हायरस चा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून किराणा दुकानदार देणार घरपोच सेवा

Advertisement

नागपूर : कोरोना व्हायरस चा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शहरातील नागरिकांना किराणा मालासारख्या दैनंदिन जीवनाश्यक वस्तुसाठी घराबाहेर पडावे लागू नये म्हणून या वस्तुंची घरपोच सेवा सुरु करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यांच्या प्रयत्नाने नागपूरातील ४५ किराणा दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत घरपोच सेवा देण्याचे मान्य केले आहे.

नागपूर महानगरपालिकेने या दुकानदारांची एक यादी तयार करुन त्यामध्ये दुकानांचे नांव, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमुद केला आहे. तरी नागरिकांनी या सेवेचा लाभ घेवून घराबाहेर पडण्याचे टाळावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.