Published On : Mon, Jan 6th, 2020

“श्री” च्या पायी पालखी दिंडी यात्रेचे कन्हान, कांद्री ला भव्य स्वागत

Advertisement

कन्हान : – श्री संत गजानन महाराज सेवा समिती, नागपुर व्दारे ‘श्री ‘चे राम टेक भेट प्रसंगाची आठवण सोहळा १३ व्या वर्षी श्री संत गजानन महाराज पायी दिंडी पालखी यात्रेचे टिमकी नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक आयोजन असुन काली मंदीर कन्हान येथे स्वागत, मुक्काम व पहाटे सकाळी भव्य स्वागतासह कन्हान शहर प्रदक्षिणासह रामटेक ला प्रस्थान करण्यात आले आहे.

श्री सदगुरू गजानन महाराज यांचे वास्तव नागपुरात श्री गोपाल बुटी यांचे वाडयात असताना श्री भक्त हरी कुका जी पाटील त्यांना परत नेण्याकरिता आले व नंतर दि. ५ जानेवारी १९०९ ला श्री गजानन महाराज सोबत रामटेक ला गेले. त्यावेळी श्री रामभक्त शंकरबुवा रामटेक गडमंदीरावर प्रभु श्रीरामाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी नित्यनेम नामाचा जप, तप व गडमंदीर परिसराची साफ सफाईचे कार्य करता-करता त्यांचा १२ वर्षाचा कालावधी लोटला असताना श्री गजानन महाराज गडावर पोहचले तेव्हा शंकर बुवा हाती झाडु घेऊन मुखाने श्रीरामाचा जप करित आंनदाने स्वच्छते चे कार्य करित होते.

तेव्हा त्यांनी बघितले की, कोदंडधारी वनवासी जटा जुट असलेले श्रीराम साक्षात गडावर येत आहेत.त्यांच्या हातातला झाडु जमिनीवर पडला व ते प्रभु श्री रामाच्या पायावर लोटले. आपल्या नेत्राच्या अश्रु धारेनी प्रभुंचे पायाचा अभिषेक केला व परत उठुन बघितले तर समोर गजानन महाराज दिंगाबर अवस्थेत दिसले. परत डोळे मिटुन उघडले तर तो साक्षात पितांबरधारी श्रीराम उभे हा भक्त व भगवंत यांच्या भेटीचा सोहळा बराचवेळ चालला. सदगुरू गजानन महाराजानी शंकरबुवाना घट आलिगन दिले आणि आर्शिवाद दिला.

हा प्रसंग म्हणजे ”जीव आणि शिव ‘ यांची एकात्मता यांचे साक्षात उदाहरण आहे. या प्रसंगाची आठवण व्हा आठवण प्रत्येक भक्ताना व्हावी या निमित्य ‘ श्री ‘ ची छोटीशी सेवा म्हणुन दि. ०३ जानेवारी २०२० ला ( पौष शु. अष्टमी) रोजी श्री संत गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रा टिम की तीन खंबा चौक नागपुर श्री हरिहर गजानन निवास येथुन प्रस्थान होऊन कामठी मार्गे सायंकाळी कन्हान नदी काठावरील काली मंदीरात स्वागता सह किर्तन, महाप्रसाद व रात्री मुक्काम दि.४ जाने. ला सकाळी ६.३० वा. पालखीचे प्रस्थान, कन्हान शहर प्रदक्षिणा वेळी गणेश नगरवासी, श्री हनुमान, गजानन मंदीर पाधन रोड रामनगर ला यात्रेकरूचे चाय, फळ ,बिस्कीट वितरण करून स्वा गत श्री गजानन सॉ मिल येथे अल्पोहार व चाय वितरण, धोटे बंधु, पोटभरे परिवार व्दारे बिस्कीट, ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व डोईजोड परिवार व्दारे कॉफी चे वितरण, शितला मंदीर कांद्री, हनुमान मंदीर कांद्री ला चाय, फराळी चिवडा आणि, भुमिपुत्र संघटन चे अतुल हजारे व्दारे पाच घोडे पालखी दिंडी समोर नाचविण्यात आले, कुंभलकर परिवार व्दारे स्नान व कपडे धुण्याचे साबण वितरण, आकरे परिवार व्दारे पालखी करूना अल्पोहार, चाय व भेट वस्तु देऊन जंगी स्वागत केले, कन्हान, कांद्री शहरवासी व्दारे भव्य स्वागत करून पुढे कांद्री, बोरडा, नगरधन मार्गे श्रीक्षेत्र रामटेक कडे प्रस्थान झाले. दि ५ जाने. रामटेक येथे आगमन व दि.६ जानेवारी २०२० ला गोपाल काल्याचे किर्तन व समापन होऊन पालखी यात्रा नागपुर करिता परत होईल. या पालखी यात्रेत मोठया संखेने भाविक मंडळी सहभागी होऊन “श्री” दर्शनाचा लाभ घेतला.