मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना पक्षाने अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारीही जाहीर केली. मात्र या उमेदवारीला प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी विरोध दर्शविला आहे. उमेदवारी दिली म्हणजे विजय होतो असे नाही. नवनीत राणा यांना पाडणार. अमरावतीमधून एका चांगल्या उमेदवाराला निवडून आणणार, असे कडू म्हणाले आहेत. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करु.
ज्यांनी भाजपचे झेंडे हाती घेतले. मेहनत केली, अंगावर गुन्हे घेतले.
रवी राणा यांनी आतमध्ये जाऊन भाजपचं कार्यालय फोडले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. पण आता काय घडले हे सर्वच पाहा. इतकी लाचारी तर कोणावरही येऊ नये.
ज्यांनी अमरावतीमधील भाजपचे कार्यालय फोडले त्याचा जयजयकार करण्याची वेळ भाजप नेते-कार्यकर्त्यांवर आली आहे, असे म्हणत कडू यांनी हल्लाबोल केला.
भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे. ३०० जागा आल्या तरी मोदी पंतप्रधान होतील. एक-दोन जागा कमी झाल्यावर काही फरत पडत नाही. अशा लोकांना घरी बसवा. त्यांची मस्ती घालवा, अशा शब्दात कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीकास्त्र सोडले.