नागपुर : 14 सप्टेंबर रोजी ‘हिंदी दिवसाचे’ औचित्य साधून महालेखाकार (लेखा व हकदारी)-II, नागपूर येथील कार्यालयातर्फे ‘हिन्दी पंधरवड्याचे’ उद्घाटन नागपूर शहराच्या परिमंडळ)-I चे पोलिस उपआयुक्त निलेश भरने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महालेखाकार दिनेश पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते. याप्रसंगी लावण्यात आलेल्या राजभाषा प्रदर्शनीच्या उद्घाटक म्हणून श्रीमती मंजूषा पाटील सुद्धा उपस्थित होत्या.
याप्रसंगी निलेश भरणे यांनी हिंदी भाषेची राष्ट्रीय एकतेमध्ये महत्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. महालेखाकार दिनेश पाटील यांनी हिंदी ही जात, धर्म व पंथ विहीन भाषा असून हिंदी भाषेमुळे राष्ट्रीय एकात्मता वृदृधींगत होत असल्याचे मत यावेळी मांडले.कार्यालयाचे कल्याण अधिकारी ए.एस. चानोरे यांनी केंद्रीय गृह मंत्र्याच्या हिंदी मंत्रालयाच्या राजभाषा विभागाव्दारे प्रकाशित केंद्रीय गृह मंत्र्याच्या हिंदी दिवसाप्रसंगीच्या संदेशाचे वाचन केले. राजभाषा अधिकारी जोसेफ यांनी अतिथींचा परिचय करून दिला. महालेखाकार कार्यालयातर्फे 2017-18 या वर्षांत झालेल्या विविध उपक्रम, प्राप्त लक्ष्य उपलब्धी तसेच पुरस्कारयांचे विवरण हिंदी अधिकारी सतीश दुबे यांनी प्रस्तुत केले.
14 ते 28 सप्टेंबर पर्यंत चालणा-या या हिंदी पंधरवाडयात लोकगीत, प्रतीक चिन्ह स्पर्धा, ‘काला’ या हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन, अभिरूप लोकसभा, शब्दज्ञान, मंजुषा, प्रश्न मंजुषा, सुगम संगीत तसेच कवी संमेलन या सारख्या विविध कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन कार्यालयातील कार्मचा-यांसाठी करण्यात येणार आहे.
उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुमन मिश्रा यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्पान्त रामटेके, राहुल कुमार, धर्मवीर भारती व उषा त्रिवेदी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.