Published On : Sat, Jun 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या हुडकेश्वर येथे किरकोळ भांडणातून मित्राची दगडाने ठेचून हत्या

Advertisement

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सौभाग्य नगर संकुलात काल रात्री दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने आपल्याच मित्राचा डोक्यात दगडाने वार करून त्याची हत्या केली.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

दारू पिऊन झालेल्या किरकोळ भांडणातून आरोपीने रागाच्या भरात हे पाऊल उचल्याचे सांगण्यात येत आहे. धवल पांडुरंग नाटकर (३३ वर्षे रा. चक्रपाणी नगर) मृत व्यक्तीचे नाव आहे. अंकुश गणेश गाखरे,(रा. सौभाग्य नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वल हा अविवाहित असून तो एलजी कंपनीत अभियंता म्हणून काम करतो. तो दररोज सौभाग्य नगर येथील बहिणीच्या घरी जेवणासाठी जायचा. आरोपी अंकुश गाखरे हा देखील त्याच वस्तीत राहतो. त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काल रात्री वेगवेगळ्या ठिकाणाहून दारू पिऊन दोघेही सौभाग्य नगर चौकात एकमेकांना भेटले होते. यावेळी दोघांनाही पुन्हा दारू प्यावेसे वाटल्याने दोघांनीही एकत्र बसून दारू पिली. दारू पिऊन घरी उशिरा आल्याने आरोपी अंकुशचे पत्नीशी भांडण झाले आणि या भांडणात पत्नी मुलांसह घरातून निघून गेली. हे ऐकून अंकुशला राग आला आणि त्याने त्याचा मित्र धवलला याची माहिती दिली.यानंतर दोघेही पुन्हा मोटारसायकलवरून महिलेच्या शोधात निघाले.

वाटेत धवलने अंकुशच्या पत्नीबद्दल काही भाष्य केल्याने आरोपीला राग आला.त्याने रस्त्याच्या मधोमध कार थांबवली आणि रस्त्यावर पडलेला दगड धवलच्या डोक्यात घातला. या घटनेची माहिती संकुलातील रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.तसेच आरोपी अंकुश गाखरे याला अटक केली.

Advertisement
Advertisement