Published On : Sat, May 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात चोरट्यांचा धुमाकूळ; कोराडीतील आर्य रेसिडेन्सीत तीन फ्लॅट फोडून लाखोंची चोरी

Advertisement

नागपूर : शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून कोराडी परिसरात मोठी घरफोडीची घटना समोर आली आहे. ओम नगर येथील आर्य रेसिडेन्सीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत तीन फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे चोरटे एका दुचाकीवरून सोसायटीत आले होते. त्यांनी अतिशय शिताफीने फ्लॅटचे दरवाजे उघडत काही मिनिटांतच चोरीची वारदात केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून संशयित चोरट्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.