Published On : Tue, Oct 5th, 2021

पीएच डी च्या गाईड साठी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ व्ही सी ला भेटले

Advertisement

नागपुर – नागपूर विद्यापीठाने दोन वर्षानंतर घेतलेल्या पेट (PET) परीक्षेत डॉ आंबेडकर विचारधारा विभागातील अनेक विद्यार्थी पास झाले. परंतु Ph D करण्यासाठी विभागाने एकाच गाईडची नियुक्ती केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गाईड न मिळाल्याने विद्यापीठाने नवीन गाईड ची नियुक्ती करावी यासाठी आज बुद्धिस्ट स्टुडन्ट असोसिएशन ने नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

शिष्टमंडळात बुद्धिस्ट स्टुडंट असोसिएशनचे सचिव उत्तम शेवडे, उपाध्यक्ष नरेश मेश्राम, सहसचिव तनुजा लामसोंगे, प्रा किशोर बिर्ला, महेंद्र रामटेके, मंगेश मेश्राम, प्रमोद श्रीरामे, चंद्रपाल सोनटक्के, परशराम पाटील, श्यामराव हाडके, दिलीप गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ आंबेडकर विचारधारा पदव्युत्तर विभागात यापूर्वी विभाग प्रमुख म्हणून डॉ प्रदीप आगलावे होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या मार्गदर्शनात या विभागात आतापर्यंत 15 व्यक्तींनी पीएच डी केलेली आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर ती जागा अजूनही रिक्त असल्याने या विभागात एकही अधिकृत गाईड नाही. यावर्षी या विभागासाठी पी डब्ल्यू एस कॉलेज चे प्रा डॉ नागसेन लांडगे सर यांची सुपरवायझर (गाईड) म्हणून प्रथमच निवड झालेली आहे.

१६ सप्टेंबर २०२१ ला पेट च्या परीक्षेचा निकाल लागला त्यात प्रा किशोर बिर्ला, उत्तम शेवडे, मंगेश मेश्राम, प्रमोद श्रीरामे, महेंद्र रामटेके, अमोल धाकडे आदी विद्यार्थी नागपूर विद्यापीठाची पेट परीक्षा पास झालेत.

आरक्षित (एससी/एसटी/ओबीसी) वर्गातील विद्यार्थ्या करिता ५% सुट असल्याने विद्यापीठातर्फे लागणाऱ्या पुनर्निकालात आणखी अनेक विद्यार्थ्यांची भर पडू शकते. अशावेळी एका गाईड कडे फक्त चार विद्यार्थी पीएच डी करु शकतात. त्यामुळे आणखी गाईडची गरज असल्याची मागणी या निवेदनाद्वारे कुलगुरु सुभाष चौधरी यांना करण्यात आली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा मध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, संविधानिक अशा विविध विषयावर पीएच डी करता येत असल्याने विद्यापीठाने UGC च्या सुधारित नियमानुसार विद्यापीठातील या विषयाच्या प्राध्यापकांची गाईड म्हणून निवड करावी अशीही मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.

कुलगुरु, कुलसचिव व पीएच डी सेलचे मोतीराम तडस व डॉ आंबेडकर विचारधारा विभागाचे कार्यकारी प्रमुख डॉ शैलेंद्र लेंडे सर यांनाही निवेदन देऊन शिष्टमंडळाने त्यांचेशी सविस्तर चर्चा केल्या.