Published On : Sat, Apr 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

हिंगणा तहसीलच्या मैदानात कुजलेला मृतदेह सापडला; अतिमद्यपानामुळे मृत्यूचा संशय

Advertisement

नागपूर : हिंगणा परिसरात तहसील कार्यालयाच्या मैदानात एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला.

घटनास्थळाजवळ उभी असलेल्या दुचाकीच्या नोंदणी क्रमांकावरून मृताची ओळख ३८ वर्षीय मनोज संतोष कडू अशी पटली. तो इसासनी एमआयडीसी भागातील रहिवासी असून पेंटिंगचे काम करून उदरनिर्वाह करत होता.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, मनोज १५ एप्रिल रोजी सकाळी घराबाहेर पडला होता. मात्र तो परत न आल्यानेही त्याच्या सवयीप्रमाणे काही दिवस घराबाहेर राहणे सामान्य असल्यामुळे हरवल्याची नोंद करण्यात आली नव्हती.

शनिवारी सकाळी एका नागरिकाने मैदानात मृतदेह पडल्याचे पाहून पोलिसांना कळवले. प्राथमिक तपासात मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असून तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

पोलिसांच्या अंदाजानुसार, अतिप्रमाणात मद्यसेवन केल्यानंतर मनोज तेथेच पडला असावा आणि शरीरातील पाण्याअभावी (डिहायड्रेशन) त्याचा मृत्यू झाला असावा. सध्या पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून घटनेमागील नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू आहे.या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास हाती घेतला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.