Published On : Sat, Jul 3rd, 2021

दालमिया सिमेंट कंपनीत कंत्राटी कामगाराचा उंचीवरून पडुन मृत्यू

गड़चांदुर :- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील डालमिया (भारत)सिमेंट कंपनीत उंचीवर काम करीत असलेल्या एका कंञाटी कामगाराचा उंचीवरून पडुन मृत्यू झाल्याची दुःखद घटना दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान घडली.

मृतक कामगाराचे नाव संतोष रामाचल चव्हाण (28) रा. नांदा फाटा येथील असल्याचे बोलले जात आहे.

डालमिया सिमेंट कंपनीत शिवा कन्स्ट्रक्शन कडे कंञाटी कामगार म्हणून संतोष हा काम करीत होता. ईएसपी चे काम अंदाजे 70ते 75 मिटर वर काम सुरू असताना आज दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान अचानक खाली पडला. त्याला उचलुन गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टर तपासणी करीत असताना त्याला मृत घोषित केले.घटनेची माहीती मिळताच सर्व कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार यांनी दवाखान्या समोर एकच गर्दी केली होती. सोबतच डालमिया सिमेंट कंपनीचे व्यवस्थापन समिती ही पोहचली आहे. कामगार संघटनेने मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला स्थाई नौकरी व आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. वृत लीहे पर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. मृतकाचे लग्न दोन वर्षा पुर्वी झाल्याचे कळते त्याला चार महिन्याचा मुलगा ही आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गडचांदूर पोलीसांचा चोक बंदोबस्त ठेवला होता.

ईएसपी चे काम सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही उपाय योजना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जर असते तर कामगाराचा मृत्यू उंचावरून पडुन झाला नसता असे बोलले जात आहे.