Published On : Fri, Aug 6th, 2021

७५ व्या स्वातंत्र दिन समांरभाच्या संदर्भात होणार समिती गठीत

महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत पदाधिका-यांनी मांडल्या सूचना

नागपूर : स्वातंत्र्याच्या ७५ वे वर्षा निमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे यावर्षी ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय मनपाद्वारे विविध संकल्पनांचे नियोजन यासंदर्भात केले जाणार आहे. या समारंभाच्या अनुषंगाने मनपा मुख्यालयात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत बैठक बुधवार (४ ऑगस्ट) रोजी पार पडली.

बैठकीत उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा, बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, विधी समिती सभापती मिनाक्षी तेलगोटे, जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, दुर्बल घटक समिती सभापती कांता रारोकर, कर आकारणी व कर संकलन समिती सभापती महेंद्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संदीप जाधव, विजय (पिंटू) झलके, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके आदी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्याला येत्या १५ ऑगस्ट रोजी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपाद्वारे विविध उपक्रमांची संकल्पना मांडण्यात आलेली आहे. उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाकरिता त्यासंबंधी नियोजनासाठी मनपाची सर्वपक्षीय विशेष समिती गठीत करण्यात येणार आहे. यासमितीद्वारे ७५ वे स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन व कार्यवाहीवर लक्ष केंद्रीत केले जाईल, अशी माहिती यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षा निमित्त मनपाद्वारे राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांच्या संदर्भात बैठकीत पदाधिका-यांमार्फत विविध सूचना मांडण्यात आल्या. या सूचनांची नोंद घेउन त्यादृष्टीने पुढे कार्य करण्याबाबत महापौरांनी निर्देश दिले.