Published On : Sat, Sep 7th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात युवक काँग्रेसच्या सचिवाविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बॅनर लावल्याप्रकरणी धंतोली पोलिसांनी युवक काँग्रेसच्या सचिवावर गुन्हा दाखल केला आहे. विशाल वाघमारे असे आरोपीचे नाव आहे.

विशाल यांच्याकडे दक्षिण-पश्चिम विधानसभा सीट युवक काँग्रेसचे समन्वयक पदही आहे.

Gold Rate
10 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,600 /-
Gold 22 KT ₹ 1,01,900 /-
Silver/Kg ₹ 1,25,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे व इतर कार्यकर्त्यांनी 2 सप्टेंबर रोजी वर्धा रोड येथील छत्रपती चौकात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात बॅनर लावले होते. दोन्ही नेत्यांवर आक्षेपार्ह टीका करण्यात आली. त्यानंतर धंतोली येथे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी कारवाई करत युवक काँग्रेसच्या सचिवावर गुन्हा दाखल केला.

Advertisement
Advertisement