Published On : Mon, Apr 17th, 2023
By Nagpur Today Nagpur News

वाडीतील जागा रिकामी करण्यासाठी ४० लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी वेल ट्रीट हॉस्पिटलच्या संचालकावर गुन्हा दाखल

Advertisement

नागपूर : वाडी पोलिसांनी वेल ट्रीट हॉस्पिटलचे संचालक प्रवीण गिरीपुंजे यांच्यावर विशाल खेमचंदानी यांच्याकडून ४० लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वाडीतील आदर्शनगर येथे रुग्णालय सुरू करण्यासाठी आरोपीला दोन मजले खेमचंदानी भाड्याने दिले होते. बिरामजी टाऊन, सदर येथील रहिवासी विशाल खेमचंदानी (३१) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालची आई रजनी यांचे आदर्श नगर येथील एका इमारतीत कार्यालय होते. या प्रकरणातील आरोपी प्रवीण गिरीपुंजे व त्याचा साथीदार डॉ.राहुल थावरे व अन्य चार संचालकांनी २०१५ मध्ये इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर कार्यालय भाड्याने घेतले होते. मात्र, २०१८ पासून आरोपींनी भाडे देणे बंद केले.

मात्र, 18 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान आरोपींनी विशालकडे जागा रिकामी करण्यासाठी 40 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर विशालने वाडी पोलिसांशी संपर्क साधून आरोपी दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.

महत्वाचे म्हणजे या अगोदर वाडी पोलिसांनी वेल ट्रीट हॉस्पिटलचे संचालक राहुल थावरे यांच्यावर 9 एप्रिल 2021 च्या रात्री हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आग लागल्याने निष्काळजीपणे चार रुग्णांचा मृत्यू झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.

Advertisement

या आगीत शिवशक्ती भगवान सोनभासरे (वय 35, रा. घोडेगाव, परसोनी), तुळशीराम सपकन पारधी (47, रा. प्लॉट क्रमांक 158, गोरेवाडा रोड, नागपूर) , प्रकाश बाबुराव बोंडे (वय 69, रा. मनीष नगर, नागपूर) आणि रंजना मधुकर कडू (वय 44, रा. धापेवाडा, कळमेश्वर तहसील), अशी मृतांची नावे आहेत.

तपासादरम्यान, वेल ट्रीट हॉस्पिटलचे आरोपी संचालक राहुल थावरे आणि हॉस्पिटल प्रशासनाने निकृष्ट विद्युत उपकरणांचा वापर केल्याचे आणि हॉस्पिटलमध्ये अग्निशमन उपकरणेही तैनात केली नसल्याचे समोर आले. आगीमुळे मनुष्यहानी आणि मालमत्तेचे नुकसान होणार हे माहीत असतानाही रुग्णालय प्रशासनाने पूर्ण निष्काळजीपणा केल्याने चार रुग्णांचा मृत्यू झाला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.