नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प भारताला आर्थिकदृष्टया बळकट व जगातील तिसरी अर्थव्यवस्था करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा, आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेयांनी व्यक्त केली.
भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही ते म्हणाले.
या अर्थसंकल्पातून भविष्याबद्दल आशा व आत्मविश्वास यातून प्रतीत होतो. भारताने ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान…’ हा नारा आजवर प्रबळ केला ; यापुढे ‘जय अनुसंधान..!!’ हा नारा भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल असा दुर्दम्य आत्मविश्वास मिळतो. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या गरजा, आकांक्षा आणि कल्याण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे… आणि तेच आज अधोरेखित झाले,असेही बावनकुळे म्हणाले.