सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका सुरु झाला आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात येत्या २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन जाहीर सभा होणार असताना त्याच दिवशी सोलापुरात महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांची संयुक्त जाहीर सभा पार पडणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महातुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा २९ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता होम मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या विस्तीर्ण मैदानावर सुमारे दोन लाखांचा जनसमुदाय उपस्थित राहील, असा विश्वास भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केला आहे.
या सभेची जय्यत तयारी होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी कर्णिक नगरातील मैदानावर शिवसेना उद्धव ठाकरे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची संयुक्त जाहीर सभा आयोजित केली आहे.
सायंकाळी ४.३० वाजता होणाऱ्या या संयुक्त सभेची तयारी होत असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा समन्यक, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे व जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी सांगितले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...
मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews
नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...









