Published On : Fri, Jul 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

राहुल गांधींना मोठा दणका ; गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली पुर्नविचार याचिका !

Advertisement

नवी दिल्ली : गुजरात उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दणका दिला आहे. मोदी आडनावाबद्दल केलेल्या विधानावरून राहुल गांधींना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. यावर गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात पुर्नविचार करणारी याचिका दाखल केली. ही याचिका आज न्यायालयाने फेटाळली असून हा राहुल गांधींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान २०१९ साली मोदी आडनावाचे सर्व चोर आहेत’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले . त्यानंतर भाजप नेते पूर्वेश मोदी यांनी आक्रमक पवित्रा घेत सुरत येथील सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या सर्व लोकांची बदनामी केल्याचा आरोप पूर्वेश मोदी यांनी केला.

याप्रकरणात दोषी ठरवत सुरत न्यायालयाने २३ मार्च २०२३ ला राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २४ मार्चला लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना अपात्र ठरवलं होतं. सुरत न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध राहुल गांधींनी २५ एप्रिलला गुजरात उच्च न्यायालयात याचिका दखल केली. मात्र, राहुल गांधींची याचिका सुरत उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे ते आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.