नागपूर : यशोधरानगर पोलीस स्टेशनअंतर्गत तिसऱ्या मजल्यावरून पडून 2 वर्षाच्या चुमिकलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.नमस्वी प्रकाश मौडेकर (योगी अरविंद नगर, गल्ली क्रमांक 6, यशोधरानगर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
नमस्वी कामावर निघालेले वडील प्रकाश मौडेकर यांना हाक मारण्याचा प्रयत्न करत असतानाच स्टीलच्या ग्रीलवर चढली.
दुर्दैवाने, तिचा तोल गेला आणि ती तिसऱ्या मजल्यावरून पडली.तिला गंभीर दुखापत झाल.
तिला तातडीने मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
माहितीच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.