Advertisement
नागपूर : हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत डोंगरगाव परिसरात १७ वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना घडली. सक्षम कैलास तीनकर असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आरोपी सौरभ उर्फ बादशाह पंधरामसह त्याचे सात सहकारी विधिसंघर्षग्रस्त मुलांनी ही हत्या केल्याची माहिती आहे.
माहितीनुसार,जुन्या भांडणाचे सेटलमेंट करण्याच्या उद्देशाने आरोपीनी मृतकाला डोंगरगाव परिसरात बोलविले व तेथे सक्षम तिनकरची हत्या करण्यात आली. आरोपी व मृतक हे वर्धा रोड छत्रपती चौक येथील संताजी कॉलेज येथे शिक्षण घेत होते.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.महत्त्वाचे म्हणजे तरुण मंडळी या गुन्हेगारीच्या विळख्यात जात असल्याचे या गुन्हेगारीच्या घटनेमध्ये स्पष्ट दिसत आहे.