Published On : Wed, Feb 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कोराडीतील १५ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात शोककळा

Advertisement

नागपूर : कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. महादुला परिसरातील १५ वर्षीय विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक ०२, महादुला समाज मंदिराजवळील जुन्या ढेगरे लेआउटमध्ये ही घटना घडली. मृत विद्यार्थिनीची ओळख अनुष्का नरेंद्र ढोक (वय १५) अशी असून ती इयत्ता दहावीची विद्यार्थिनी होती.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का आपल्या आजोबा रामभाऊ देवरावजी ढोक यांच्यासोबत राहत होती. तिचे वडील सीआरपीएफमध्ये कार्यरत असून सध्या मणिपूर येथे नियुक्त आहेत. ८ मार्च रोजी आजोबा कुटुंबासह एका नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी कलमेश्वर येथे गेले होते. त्या वेळी अनुष्का घरी एकटीच होती. याच दरम्यान तिने घरातील छताच्या पंख्याला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. आजोबांच्या जबाबावर व खोलीत आढळलेल्या सुसाइड नोटच्या आधारे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisement
Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges